सैतान आणि गाढव
एक गाढव झाडाला बांधलेले होते. सैतान आला आणि त्याने ते गाढव सोडून दिले. ते गाढव शेतात घुसले आणि उभ्या पिकाची नासधूस करू लागले. शेतकऱ्याच्या बायकोने हे पाहिले आणि बंदुकीच्या गोळीने गाढव ठार केले. गाढवाच्या मालकाला हे सहन झाले नाही,त्याने शेतकऱ्याच्या बायकोला ठार केले. इकडे शेतकरी घरी आला.बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पाहून संतापला आणि त्याने गाढवाच्या मालकाला ठार मारले. गाढवाच्या मालकाच्या बायकोने आपल्या मुलांना आदेश दिला की,शेतकऱ्याचे घर पेटवून द्या. त्या संध्याकाळी तिच्या दोन मुलांनी शेतकऱ्याचे घर पेटवून दिले आणि शेतकरी त्यात जळून खाक झाला असेल,या आनंदात घरी आले. परंतु त्या आगीतून शेतकरी वाचला,तो परत आला आणि त्याने गाढवाच्या मालकाची बायको आणि दोन मुले ठार केली. पाश्चातापाने शेतकऱ्याने सैतानाला विचारले की हे सगळे असे का घडले ? त्यावर सैतान म्हणाला की, *"मी काहीच केले नाही,मी तर फक्त गाढवाला मुक्त केले होते.तुम्ही त्यावर क्रिया-प्रतिक्रिया करत बसला आणि आपल्यातल्या सैतानाला मुक्त केले."* *त्यामुळे इथून पुढे उत्तर देताना,प्रतिक्रिया व्यक्त करताना,बातमी देताना,धिक्कार करताना,सुड व ब...