पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सैतान आणि गाढव

एक गाढव झाडाला बांधलेले होते. सैतान आला आणि त्याने ते गाढव सोडून दिले. ते गाढव शेतात घुसले आणि उभ्या पिकाची नासधूस करू लागले. शेतकऱ्याच्या बायकोने हे पाहिले आणि बंदुकीच्या गोळीने गाढव ठार केले. गाढवाच्या मालकाला हे सहन झाले नाही,त्याने शेतकऱ्याच्या बायकोला ठार केले. इकडे शेतकरी घरी आला.बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पाहून संतापला आणि त्याने गाढवाच्या मालकाला ठार मारले. गाढवाच्या मालकाच्या बायकोने आपल्या मुलांना आदेश दिला की,शेतकऱ्याचे घर पेटवून द्या. त्या संध्याकाळी तिच्या दोन मुलांनी शेतकऱ्याचे घर पेटवून दिले आणि शेतकरी त्यात जळून खाक झाला असेल,या आनंदात घरी आले. परंतु त्या आगीतून शेतकरी वाचला,तो परत आला आणि त्याने गाढवाच्या मालकाची बायको आणि दोन मुले ठार केली. पाश्चातापाने शेतकऱ्याने सैतानाला विचारले की हे सगळे असे का घडले ? त्यावर सैतान म्हणाला की, *"मी काहीच केले नाही,मी तर फक्त गाढवाला मुक्त केले होते.तुम्ही त्यावर क्रिया-प्रतिक्रिया करत बसला आणि आपल्यातल्या सैतानाला मुक्त केले."* *त्यामुळे इथून पुढे उत्तर देताना,प्रतिक्रिया व्यक्त करताना,बातमी देताना,धिक्कार करताना,सुड व ब...

कोरोना महामारी काय शिकवते?

*कोरोना महामारी काय शिकवते?*  महामारीचा उगम हा नैसर्गिक याबरोबरच मानवनिर्मित असू शकतो हे बदलत्या काळाने सिद्ध केले आहे. थोर विचारवंत व अभ्यासक असं मानतात की  'प्रत्यक्ष अस्तित्वाला आव्हान देणारी संकटे आली तर  आपल्यात असलेली शक्ती अजमावता येते'. प्रलय हा बऱ्याचदा नैसर्गिक असला तरी काही अंशी उन्माद कारणीभूत होतो. निसर्ग नेहमीच समतोल साधण्याचा प्रयत्न करतो साधतो प्रयत्न. प्रत्येक जीवाचा निसर्गावर समान अधिकार. पशुपक्षी,  पर्वत,  नद्या,  जंगल,  वृक्ष जलचर,  जीवजंतू आणि माणूस निसर्गाने सर्वांना आपले  वास्तव्यस्थान  नेमून दिलेय. नियमाचा भंग केला तर  प्रकोप निश्चित,  हा आतापर्यंतचा इतिहास.  बुद्धिमान आणि शक्तिशाली माणूस समुद्र तळाखाली आणि परग्रहापर्यंत पोहचलाय. इतिहासात अनेक उलथापालथी, महामारी येऊन गेल्या,  प्रजाती नष्ट झाल्या, काही नामशेष होण्याच्या मार्गावर,  पण माणूस मात्र प्रगतीच्या दिशेने चाललय. कोरोना महामारी आजच्या पिढीला अनोखी. अनेकदा काल्पनिक कथा,  चित्रपटांतून अनुभवलेले  आभासी जग प्रत्येक जण आज  ...

लोकांची होणारी लूट कोण थांबवणार?

*लोकांची होणारी ही लूट कोण थांबवणार?* फ्रंट लाईन वॉरियर सतत कोरोना सोबत लढाई करत आहेत, त्यांच्या शिवाय लढाई अशक्य. त्यांच्यावर वेगवेगळे नियम लावून प्रसंगी अनेक कारवाईची भीती दाखवून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जात आहे. हा सर्व जीवाशी असणारा खेळ.  यात होणारा खर्चही जास्त घेऊ नये अगदी माफक दारात उपचार खर्च लावावा असेच सर्वांचे मत.  सर्व गरीब श्रीमंत यात भरडले जात आहेत अशा वेळी गरिबांना अशा प्रकारे सवलत देणे सर्वांसाठी उचितच आहे.  पण एकीकडे उपचार खर्चावर आरोळ्या ठोकणारे जेव्हा याच वॉरियर्स ला लागणारे साहित्य (PPE किट, सॅनिटायझर, इन्फ्रारेड थर्मामिटर इ ) जेव्हा दुप्पट तिप्पट किंमतीत विकतात तेव्हा मूग गिळून गप्प का बसतात? यावेळी महामारी चे संकटात हॉस्पिटल, दवाखाने, opd चालवण्यास होणारा खर्च चीन /अमेरिका अनुदान म्हणून देत आहे का?  जर वॉरियर्स ना अक्कल शिकवायची असेल, त्यांनी काम कशा प्रकारे करावे हे फुकटचे सल्ले द्यायचे झटके ज्यांना येत असतील त्यांनी जरा इतर होणाऱ्या लुटीकडे बघितलं तर समाजसेवा नाही का होणार?  दुसऱ्या ठिकाणाहून रोजगारासाठी आलेले लोक भीतीपोटी आपा...